कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा बेळगावात धुडगूस घालत महानगरपालिकेसमोर ठाण मांडले. बेळगाव येथील अनगोळ मध्ये जय महाराष्ट्र चौक अनगोल बेळगाव असा फलक लावण्यात आलेला आहे.
या फलकावर जय महाराष्ट्र लिहिले असल्याने याचा पोटशुल कानडीगांना झालाय. त्यामुळे त्यांनी हा फलक काढण्याची मागणी केली आहे .
जर हा फलक काढण्यात आला नाही तर आम्ही आमच्या पद्धतिने हा फलक काढू असा इशारा दिलाय. अनघोळ या भागात मराठी भाषिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.
जर हा हा फलक काढण्यात आला तर बेळगाव मध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.सध्या कानडिगांची मराठी फलकावर वक्रदृष्टी आहे