This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी 10 एप्रिल नंतर जाहीर*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरातील काँग्रेस भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या पत्रकार परिषदेत केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डी चे आमदार सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी 10 एप्रिल नंतर जाहीर होईल असे सांगितले.

यावेळी पुढे ते म्हणाले निवडणुकीत उमेदवारांसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र शेवटी एकट्यालाच उमेदवारी द्यावी लागते पक्ष सर्व बाजूने विचार विनिमय करून निर्णय घेणार आहे.

आम्ही दोन याद्या जाहीर केला यावेळी काही ठिकाणी असंतुष्टाची नाराजी समोर आली आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी आम्ही दूर करत आहोत आणि तिसरी यादी 10 एप्रिल नंतर जाहीर करण्यात असल्याचे सांगितले.

पुढे ते म्हणाले बेळगाव उत्तर मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून कोणताही गोंधळ आणि मतभेद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच पक्षाने मतदार संघात सर्वे करून मतदारांची मते जाणून घेऊनच उमेदवारी दिली आहे.

फक्त बेळगावात नाही तर कित्तूर सौंदत्ती मध्ये देखील पक्षाने हे काम राबविले आहे आणि येणाऱ्या निवडणुकी करीता आम्हाला प्रचाराकरिता कोणत्याही सेलिब्रिटीची गरज भासणार नाही असे देखील स्पष्ट केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24