बेळगांव:गांधीनगर येथील राजवीर मेटल चोरट्याने धाडसी चोरी करून जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच चोरट्याने दुकानांमध्ये ग्राइंडर ने कुलूप तोडून सीसीटीव्ही देखील फोडले आहेत आणि आत प्रवेश करून तांबे पितळ आणि अल्युमिनियमची महागडी भांडी ट्रक मध्ये भरून सर्व साहित्य लंपास केले आहे.
चोरट्यांनी ही धाडसी चोरी मंगळवारी रात्री केली आहे. सदर दुकान हे देव जोशी यांचे असून त्यांच्या दुकानांमध्ये पंधरा लाखांची चोरी केली आहे.
या प्रकरणाची माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत . सध्या लग्नाचा सीजन जवळ येत असल्याने दुकान मालकांनी दुकानांमध्ये नवीन भांडी आणून ठेवली होती तीच भांडी चोरट्यानी चोरी केली आहेत.