चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग देवस्थानची नुतन वास्तू उभारली असून मंदिर उभारणीचे कार्य २०१९ ला सुरू झाले आणी चार वर्षानी मंदिर पुर्ण झाल्यानंतर पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह वास्तूशांती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यानंतर देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने भुमी पूजन पासून वास्तू शांती सोहळ्या पर्यंतचा जमा खर्चाचा तपशील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मांडण्याच्या निर्णय घेतला आहे यावेळी देणगीच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम तसेच मंदिर लागलेले बांधकाम साहित्यासह इतर खर्चाचा तपशील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मांडण्यात येणार आहे.
तसेच मंदिरची पुढील अपुर्ण कामाची माहिती आणी त्याचा अंदाजे खर्च याचीही माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे तरी गावातील समस्त ग्रामस्थांनी रविवारी दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता गावच्या चावडीत उपस्थित राहावे असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने केले आहे