This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*सहाव्या दिवसाच्या दौडची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सहाव्या दिवसाच्या दौडची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथून करण्यात आली यावेळी दुर्गादेवी मंदिरात दुर्गादेवीची आरती करून ध्वज चढविण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रुद्र केसरी मठाचे श्री हरी गुरु महाराज यांच्या हस्ते ध्वज चढून प्रेरणा मंत्र म्हणून दौडला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सहाव्या दिवशीच्या दौड मध्ये प्रचंड मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी दौड मध्ये भक्ती गीत घोषणा देत धारकारांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी भारत नगर खासबाग वडगाव मधील आणि कल्याण मधून फिरून जुने बेळगाव नाझर कॅम्प आनंदनगर संभाजीनगर अशा विविध मार्गावरून फिरून शेवटी मंगाई मंदिर येथे दौडची सांगता करण्यात आली.

यावेळी मंगाई देवीची आरती करून हजारो धारकऱ्यांनी ध्येयमंत्र म्हणून प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश सोनवलकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.

दौडीच्या मार्गावर सुहासिनी महिला आरती घेऊन सज्ज झाल्या होत्या तसेच विविध ठिकाणी दौडीचे जल्लोषत आणि उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवकांचा उत्साह देखील पाहायला मिळाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now