हनुमान यात्रेनिमित्त मुतगा येथे हनुमान कुस्तीगीर संघटना आणि ग्रामस्थाच्यावतीने उद्या रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचे करण्यात आले आहे. दमनी तलावात मैदानाचे आयोजन करण्यात आले असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.
या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी किरण भगत व जागतिक कुस्ती चॅम्पियन आशिष हुड्डा यांच्यात होणार आहे. किरण भगत व आशिष हुड्डा यांच्यात प्रथमच लढत होणार आहे. दोघेही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असल्याने कोण जिंकणार याची कुस्ती शौकिनांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाच्या अनुज कुमार लिलू आखाडा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व बाळू अपराध सांगली यांच्यात , चौथ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे, कंग्राळी व समाधान गरुड पुणे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व संजू इंगळगी दर्गा तालीम, सहाव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व ऋषिकेश देवकाते, सातव्या क्रमांकाची लढत प्रेम कंग्राळी व सुरेश रुपनर सांगली, आठव्या क्रमांकाची कुस्ती गुत्तप्पा दावणगिरी व कार्तिक इंगळगी दर्गा, नव्या क्रमांकाची लढत पृथ्वी कंग्राळी व गौस कुंदरर्गी दर्गा, दहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे व हनुमंत गंदीगवाड यांच्यात होणार आहे.
कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ मल्ल भावकाण्णा पाटील, आण्णाप्पा बस्तवाड, जयसिंग पाटील, नामदेव पाटील, सयाजी पाटील, सातेरी पाटील, तुकाराम पाटील, जानबा पाटील, जोतिबा केदार, श्रीकांत पाटील, कृष्णा शिंदोळकर, विलास पाटील, मनोहर कडेमणी, सुधीर पाटील, शंकर पाटील, अनिल कडेमणी, कुस्ती संयोजन समितीचे सचिव नवीनकुमार पाटील परिश्रम घेत आहेत.