गोव्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. चार वर्षाच्या मुलालाचा त्याच्या आईने खून केलाय. कंडोलीमच्या हॉटेल सोल बनियान ग्रांडे येथे रूम नंबर 404 मध्ये हा प्रकार घडलाय.
39 वर्षीय सूचना सेट या आपल्या मुला समवेत गोवा येथे गेल्या होत्या. शनिवारी त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केले होते तर सोमवारी सकाळी हॉटेलमधून बाहेर पडल्या ज्यावेळी ते हॉटेलमधून बाहेर पडला त्यावेळी त्या एकटाच होत्या. चेक करताना त्यांनी बेंगलोर येथील आपला पत्ता दिला होता.
सोमवारी सकाळी चेक आऊट झाल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची रूम साफ करण्याकरिता गेला असता तेथे रक्ताचे डाग आढळून आले. नंतर त्यांनी लगेच कलंगुट पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर परिश नाईक यांना सांगितले यांनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की जेव्हा सूचना यांना बेंगलोरला परत जाण्यासाठी टॅक्सी हवी होती तेव्हा त्यांना विमानाने गेलात तर अधिक सोयीस्कर होईल असा सल्ला दिला मात्र तिने टॅक्सी ने जाण्याचा आग्रह धरला त्यामुळे हॉटेल ने टॅक्सीची व्यवस्था केली.
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उत्तर गोव्याचे एसीपी निधीन वलसन यांना रक्ताच्या दागाची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले यावेळी सूचना आपल्या मुलाशिवाय हॉटेल बाहेर पडताना दिसल्या.
त्यामुळे पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला फोन देण्यास सांगितले. यावेळी मुलाबद्दल विचारणा केली असता सूचनाने त्याला पातोडा येथे मित्राच्या घरी पुढल्या असल्याचे सांगितले मैत्रिणीचा पत्ता द्यायला सांगितल्यावर तिने खोटे तपशील पाठविले.
त्यानंतर परेश नाईक या पोलीस इन्स्पेक्टर यांनी टॅक्सी चालकाला पुन्हा फोन केला आणि त्यांच्याशी कोकणी मध्ये संवाद साधला यावेळी प्रवाशाला काहीही संशय न घेता जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते. ड्रायव्हरने सूचनाला कधीही सूचना न देताच गाडी थेट आय मंगला पोलीस स्टेशन कडे नेली. त्यावेळी तेथील एका अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता पिशवीत मुलाचा मृतदेह आढळल्याने इन्स्पेक्टर नाईक यांचा संशय खरा ठरला आहे ….