बेळगाव मध्ये होणार 25 जूनला अग्नीवर भरती प्रक्रिया
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे 25 जून 2023 पासून अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही अग्नी वीर भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांकरिता होणार आहे.
आजी-माजी सैनिकांच्या मुलांकरिता येत्या 25 जून ते एक जुलै 2023 या कालावधीमध्ये या अग्नीवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अग्नीवीर जनरल ड्यूटी जीडी, अग्निवीर ट्रेडमन क्लार्क स्टोअर किपर टेक्निकल या पदांसाठी ही भरती होणार आहे. 45 टक्के गुण प्राप्त केलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अग्निवीर जीडी साठी अर्ज करता येणार आहे तसेच वाहन परवाना असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे पियूसी उत्तीर्ण व किमान 60% गुण असलेल्यांना अग्नीवीर क्लार्क व स्टोर कीपर साठी ही भरती होणार असून यामध्ये खेळाडूंसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे.
दिनांक 25 जून रोजी स्क्रीनिंग ऑफ आऊटस्टँडिंग स्पोर्ट्समन अग्नीवर जनरल ड्युटी संपूर्ण भारतात सर्व जातींसाठी होणार आहे तर 26 दोन रोजी बीड भंडारा छत्रपती संभाजी नगर जळगाव कोल्हापूर अकोला अमरावती चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया अहमदनगर मुंबई लातूर आदी विभागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
तर 27 जून रोजी पुणे परभणी पालघर धाराशिव नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक रायगड रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग वर्धा ठाणे, वाशिम आदी विभागांना स्थान दिले जाणार आहे.
त्याचबरोबर भरतीसाठी दिनांक 28 रोजी छत्तीसगड गुजरात गोवा कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांना संधी प्राप्त होणार आहे. अधिक माहितीसाठी इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.