This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्राचार्य व प्राध्यापकांनी यासाठी छेडले आंदोलन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राचार्य व प्राध्यापकांनी यासाठी छेडले आंदोलन

राज्यातील पदवी पूर्व शिक्षण खात्याचे अस्तित्व अबाधित ठेवण्याकरिता आज बेळगाव जिल्हा पदवी पूर्व कॉलेज कर्मचारी महामंडळ पदवी पूर्व कॉलेज प्राचार्य संघ पदवी पूर्व कॉलेज प्राध्यापक संघ पदवी पूर्व कॉलेज अतिथी प्राध्यापक संघ आणि पदवी पूर्व शिक्षकेतर कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

सर्व शिक्षकांनी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी सर्व शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे व निषेधाचे फलक धरून मूक आंदोलन छेडले.

यावेळी शिक्षकांनी असे सांगितले की बारावीची परीक्षा ऑक्टोबर मध्ये घेण्यात येत होती नंतर ते जून मध्ये घेतली जाऊ लागली आता त्यामध्ये बदल करत तीन परीक्षा घेण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.

मात्र जून मध्ये परीक्षा घेतल्यास महाविद्यालय सुरू झालेली असतात त्यावेळेस परीक्षेच्या कामामुळे प्राध्यापकांना किमान महिनाभर आपले वर्ग घेता येणार नाहीत.या पद्धतीने तीन परीक्षा घेण्यात आल्या तर प्राध्यापकांचे मुलांना शिकवण्याचे तीन महिने वाया जाऊ शकतात त्यामुळे आधीची शिक्षण पद्धती सुरू ठेवावी अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

त्यानंतर बोलताना प्राचार्य संघ बेळगावचे अध्यक्ष प्राचार्य पुंडलिक कांबळे म्हणाले की आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमचे आमच्या खात्याचे प्रभारी म्हणून जिल्हा पंचायतचे उंची नियुक्ती केल्याचा आदेश सरकारने बजावले आहे. हा देश अवैज्ञानिक असून तो मागे घेतला जावा त्याचप्रमाणे तीन परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच एकच वार्षिक परीक्षा घेतली जावी अशी मागणी केली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now