बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी समर्थ नगर येथे जनता दरबार घेतला. त्यांनी या भागाला भेट देऊन परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
स्थानिक नगरसेवक आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत ते या परिसरात होणाऱ्या सुधारणांबाबत चर्चा केली .त्यांनी समर्थ नगरमधील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
पायाभूत सुविधा आणि परिसराच्या इतर पैलूंमध्ये सुधारणा करण्यासाठी काय करता येईल यावर त्यांनी चर्चा केली आणि रहिवाशांनी गरजा काय आहेत ,कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे याबद्दल माहिती घेतली .
त्यांनी रहिवाशांशी पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि त्यांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले आणि पिण्याच्या पाण्याचा विनाकारण अपव्यय करू नका असे सांगितले