बेळगावचे उत्तर आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी शिक्षणाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. निवडूण आल्यापासून त्यांनी अनेक सरकारी शाळांना भेटी देऊन शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास कार्य केले आहे. आज आझम नगर येथील सरकारी शाळेच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिज्ञासा व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठही उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आ आसिफ सेठ म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्कंठा व उत्साह दिसून आला आणि मला शाळेला भेट देऊन या विज्ञान प्रदर्शनाचा एक भाग बनल्याचा आनंद होत आहे. मी या शाळेला अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी कठोर परिश्रम घेईन. माझ्या भागातील सरकारी शाळामध्ये”विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि ज्ञान वाढवत राहण्यासाठी प्रोत्साहित करीत असे त्यांनी सांगितले.