फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा बेळगावमध्ये दाखल झाला असून फ्रूट मार्केटमध्ये त्याचा लिलाव देखील पार पडला.बेळगाव फ्रूट मार्केट मधील एम.बी.देसाई यांच्या दुकानात दोन प्रकारच्या हापूस आंब्यांची आवक झाली होती.लिलाव प्रक्रिया देखील
संदीप देसाई यांनी आंब्याची पूजा केल्यावर एम.बी.देसाई यांच्या दुकानात लिलावाला प्रारंभ झाला.एका हापूस जातीच्या अर्धा डझन आंब्याच्या लिलावाला एक हजार रुपयांपासून प्रारंभ झाला.
अखेर तीन हजार पाचशे रुपयाला विक्री करण्यात आली.दुसऱ्या प्रकारच्या हापूस आंब्याची तीन हजार सहाशे रुपयांना विक्री करण्यात आली.आंब्याची आवक बेळगाव फ्रूट मार्केटमध्ये सुरू झाली असून पुढील काही दिवसात आंब्याची आवक वाढणार आहे.फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आंब्याचे दर कमी होतील अशी माहिती संदीप देसाई यांनी दिली.