This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*फूड पार्क बेळगावकरांसाठी पर्वणी ठरेल*

*फूड पार्क बेळगावकरांसाठी पर्वणी ठरेल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : एकाच छताखाली देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित चवं चाखता यावी, यादृष्टीकोनातून बेळगाव नेहरूनगर येथील ‘फूड पार्कने’ स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांसह पुनरागमन केले आहे. याचा लाभ घ्यावा असे उद्गार केएलई सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी काढले.

फूड पार्क, हॉटेल रामदेव बेळगावीच्या मागे पुन्हा आपल्या नव्या थाटात सादर करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार आसिफ सेठ, आमदार चेन्नराज हट्टीहोळी, शरथचंद्र महांतेश कवटगीमठ, माजी नगरसेवक शिवनगौडा पाटील, राहुल रायबागी, वेंकटेश रायबागी, ध्रुव पटेल, कनव सुरी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

‘फूड पार्क’ या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना राहुल रायबागी म्हणाले की, मेट्रोसिटीच्या धर्तीवर बेळगावमध्येही खव्वय्यांसाठी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरु असल्याने या ‘फूड पार्क’ची उभारणी करण्यात आली आहे.

*फूडपार्कची वैशिष्ट्ये :*

शहराच्या मध्यभागी नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या विस्तृत जागेतील फूडपार्कमधील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत. गरम पिझ्झा ते स्वादिष्ट चायनीज पदार्थ आणि माऊथ वॉटरिंग कबाब या खाद्यपदार्थांची त्यात भर पडली आहे.

खाद्यप्रेमींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी बनविण्यात येणारे सर्व पदार्थ हे ताजे आणि अतिशय उत्कृष्ट असतात, तसेच स्वच्छता आणि खाद्यप्रेमींची पसंद लक्षात घेऊनच बनविण्यात येतात.

फूड पार्क हे केवळ अन्नच नाही तर ते कायमस्वरूपी आठवणी निर्माण करेल असे स्थान आहे. कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसह याठिकाणी जमून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो. केवळ खाद्यपदार्थच नाही तर प्रत्येकाचे मनोरंजदेखील याठिकाणी व्हावे या उद्देशाने फूड पार्कची संकल्पना अंमलात आणली आहे. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यासह भारतीय खाद्य संस्कृती प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तोंडात रेंगाळणाऱ्या चवीचे पदार्थ खाद्यप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या विलक्षण अनुभवाचा आनंद घेण्यासाठी बेळगावकरांनी “फूड पार्क”ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन राहुल रायबागी यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24