This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सीमाभाग युवा सेनेची बेळगावात पहिली आढावा बैठक पार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

<span;>बेळगांव: डॉक्टर सतीश नर्सिंग यांचे युवासेना सीमा भागाच्या विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल बेळगाव मध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
<span;>येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  यांच्या युवा सेनेची संपुर्ण सीमाभागातील व्यापक बैठक  बेळगाव मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.

<span;> यावेळी बेळगाव,निपाणी,खानापुर,चिक्कोडी,अशा बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
<span;>
<span;>बेळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभा क्षेत्रात युवा सेनेचे काम खुप आधी पासुन चालु आहे.बेळगाव मतदार संघाचा बेळगाव विभाग व निपाणी-चिकोडी लोकसभा मतदार संघाचा निपाणी विभाग अश्या दोन्ही ठिकाणी युवा सेनेने  गेल्या ८-९ वर्षापासुन अनेक  लोकउपयोगी  सामाजीक उपक्रम , युवकांच्या प्रश्नावर आंदोलन करत  आपली छाप टाकली आहे. मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही युवा सेना त्या ठिकाणी सतत कार्यरत आहे. युवा सेनेचे सर्वच स्तरातुन यासाठी कौतुक होते .शिवसेनेतील बंडा वेळीही सीमाभागातील सर्व युवा सैनीक  ठाकरे यांच्या सोबतच राहीले व एकही शिवसैनीक फुटुन दिला नाही. युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या डॅशींग नेतृत्वावर अनेक तरुण युवा सेनेकडे आकर्षीत होत आहेत.शिक्षण,आरोग्य,रोजगार या युवकाच्या मुलभुत प्रश्नावर आज पर्यंत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या युवा सेनेने आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्याने बेळगाव जिल्हातील युवा सेनेची “राजकीय” ताकद या बैठकीच्या निमित्ताने दिसुन आली.

<span;>सध्याचे वातावरण पाहता सीमाप्रश्नाकडे झालेली  उदासीनता पाहुन सीमाभागात ही ” ठाकरेंची यंग ब्रीगेड “ॲक्शन मोडवर येण्याच्या तयारीत आहे .. लवकरच युवा सेनेचा विस्तार पुर्ण सीमाभागात करण्याची तयारी   ही सुरु आहे ..युवा सेनेचे विनायक हुलजी,ऋषिकेश सौंदलगेकर , सोमनाथ सावंत,मयांक पावशे,वैभव कामत,अद्वैत चव्हाण-पाटील,उमेश पाटील, श्वेता तवशेट्टी, ओमकार बैलुर, प्रणव बेळगांवकर, अमेश देसाई, प्रसाद मनसे,वैष्णव जाधव, शुभम कांबळे, चैतन्य होंगेकर उपस्थित होते.
<span;>*नव्या विस्तारकांची निवड सत्कार*
<span;> युवा सेनेचे सीमाभागातील काम पाहत युवा सेना सचीव वरुण जी सरदेसाई यांनी सीमाभागासाठी डॅा. सतीश नरसींग यांची विस्तारक पदी नियुक्ती केली आहे ..  त्याबद्दल युवा सेना सीमाभागने त्यांचा सत्कार  ही केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश  शिरोळकर ,  समीतीचे युवा नेते शुभम शेळके, दिलीप बैलूरकर,सुरज कणबरकर तसेच आजी माजी  शिवसेनेचे पदाधीकारी व सैनीक उपस्थीत होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now