This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*वंटमुरी गावातील महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरण आता सीआयडी कडे सोपवण्याचा निर्णय*

*वंटमुरी गावातील महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरण आता सीआयडी कडे सोपवण्याचा निर्णय*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वंटमुरी गावातील महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरण आता सीआयडी कडे सोपवण्याचा निर्णय

बेळगाव जवळील वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सी आय डी कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे.राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या सदस्यांनी वंटमुरी गावाला भेट देऊन तसेच पीडित महिलेची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माहिती घेतली.भाजपच्या सत्यशोधक समितीच्या चार महिला खासदारांनी देखील पीडित महिलेची भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

पीडित महिलेला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली असून दोन एकर जमीन देखील मंजूर करण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास ए सी पी एस. व्ही.गिरीश यांच्याकडे सोपवण्यात आला असून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय सिन्नुर यांना निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणी आजवर एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

सी आय डी चे डी आय जी सोमवारी बेळगावला येणार असून तपास अधिकाऱ्यांच्या कडून घटनेची माहिती घेऊन पुढील तपास सुरू करणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24