This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चेकमेट स्कूल ऑफ चेस आयोजित बुद्धीबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चेकमेट स्कूल ऑफ चेस आयोजित बुद्धीबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद : अर्णव पाटील, श्रीकरा दरबा, अथर्व तावरे ठरले अव्वल

बेळगाव : चेकमेट स्कूल ऑफ चेस यांच्यावतीने आणि एसजीबीआयटी कॉलेज व्यवस्थापन मंडळ, बीएससी मॉल, प्रकाश सेल्स एजन्सी, एलआयसीचे सिनिअर बिजनेस असोसिएट अतुल देशमुख, हजारे किचन वेअर व केतन एंटरप्राइजेस यांच्या सहयोगाने बाल दिनाचे औचित्य साधून एकदिवशीय चिल्ड्रन रॅपिड टूर्नामेंट – 2023 चे आयोजन करण्यात आले होते.

9 वर्षाखालील, 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. या बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 194 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता.एसजीबीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी, ज्येष्ठ व्यावसायिक अतुल देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली.

स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात अर्णव पाटील, सिद्धांत थबाज व वेदांत थबाज यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. तर दिव्यांश तळीमणी याने चौथा, आदित्य ठाकूर याने पाचवा, विराज कट्टीमनी याने सहावा, सुचेतन आय. बी. याने सातवा, सुरज श्रेष्ठ याने आठवा, घोणेस्कर इंगोले अर्णव याने नववा तर वरद हेमंत देसाई याने दहावा क्रमांक पटकाविला.

या गटात तन्मय संभाजी, सारा पावले कागवाड व आराध्या मनगनवी ह्या मुलीनी उत्कृष्ट बुद्धीबळपटू म्हणून अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. यंगेस्ट बॉय म्हणून अभिनव बळीगार तर यंगेस्ट गर्ल म्हणून आरोही पाटील तसेच उदयन्मुख बुद्धिबळ खेळाडू म्हणून श्रीनिवास पाटील व सिद्धांत सी. पावशे यांनी बाजी मारत बक्षीसे पटकाविली.

17 वर्षाखालील वयोगटात श्रीकरा दरबा, सचिन पै व साई परशुराम मंगनाईक यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. तर मोहम्मदसाब इमरान बरसकर, विनायक कोळी, आर्यमान निगम, माधव दत्तात्रयराव दासारी, साईप्रसाद कोकाटे, गगन मुतगी व साकेत भरत मेळवंकी यांनी अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा व दहावा क्रमांक पटकाविला.

या गटात श्री घोणस्कर, स्वर्णिका ठाकूर व अन्वेषा गुडनवर या मुलींनी उत्कृष्ठ बुद्धीबळपटूं म्हणून अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.

13 वर्षांखालील वयोगटात अथर्व तावरे, विलास अन्द्रादे व अपूर्वा ठाकूर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. तर अनिरुद्ध दत्तात्रयराव दासारी याने चौथा, सिद्धार्थ एम. जोशी याने पाचवा, सहर्ष टोकळे याने सहावा, अद्वय सचिन मन्नोळकर याने सातवा, प्रेम निश्चल याने आठवा, नारायण पाटील याने नववा तर आदित्य देसाई याने दहावा क्रमांक पटकाविला. या वयोगटात वैष्णवी वडीराजू, निधी पोटे व आहदिया सय्यद यांनी उत्कृष्ठ बुद्धिबळपटूं म्हणून अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक गिरीश बाजीगर, अदिती बाचीकर, ललिथा दरबा, नित्यानंद शास्त्री दरबा, एसजीबीआयटी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख अरळीमट्टी यांच्या हस्ते विविध गटातील विजेत्या बुद्धिबळपटूंना रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र आदी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेकरिता जागेची व्यवस्था एसजीबीआयटी कॉलेज प्रशासनाने केली. बीएससी मॉलने ट्रॉफीज तर प्रकाश सेल्स एजन्सीने चेस बुक, एलआयसीचे सिनिअर बिजनेस असोसिएट अतुल देशमुख यांनी चेसबोर्ड तर हजारे किचन वेअर व केतन एंटरप्राइजेस यांनी रोख बक्षिसांची रक्कम पुरस्कृत केली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आकाश मडीवाळर, पवन शालगार, राहुल कांबळे आणि सक्षम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24