This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*महिलेला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना उघडकीस*

*महिलेला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना उघडकीस*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिलेला नग्न करून खांबाला बांधून घालून तिला मारहाण केल्याची धक्कादायक आणि अमानवीय घटना बेळगाव जवळील वंटमुरी गावात घडली आहे.महिलेचा मुलगा आणि त्याची प्रेयसी पळून गेल्याने मुलीच्या घरच्यांनी हे अमानवी कृत्य केले आहे.
नग्न करून मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव कमलव्वा नायक (४२) असे असून तिच्या घरावर मुलीच्या कुटुंबीयांनी हल्ला केला.नंतर तिला घराबाहेर काढून विवस्त्र करून विजेच्या खांबाला रात्रभर बांधून ठेवून मारहाण केली.

दुंडप्पा आणि प्रियांका यांचे प्रेमसंबंध होते.रविवारी रात्री हे दोघेही घरातून पळून गेले.प्रियांकाचे लग्न ठरले होते आणि सोमवारी तिचा साखरपुडा होणार होता.पण दुंडप्पा आणि प्रियांका हे रात्री पळून गेल्यामुळे संतापलेल्या प्रियांकाच्या कुटुंबीयांनी दुंडप्पाच्या घरावर रात्री हल्ला केला आणि त्याच्या आईला घरातून बाहेर काढून विवस्त्र करून विजेच्या खांबाला रात्रभर बांधून घालून मारहाण केली.पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री डॉ.जी.परमेश्वर यांनी घेतली असून पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.पोलीस दुंडप्पा आणि प्रियांका यांचा शोध घेत आहेत.गावात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पीडित महिलेची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेऊन तिला धीर दिला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24