कौलगे येथील नवीन दत्त-पंत मंदिराच्या वास्तुशांती व उद्घाटन मान्यवर आणि भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला .दत्त पंत मंदिराच्या उभारणीला महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक मदत केली आहे.
यासाठी कौलगे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना कृतज्ञता पत्र देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांचा सामाजिक कार्यासाठी कृतज्ञतापत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कागल भागातील नागरिक आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.