This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*आरोपींना चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून ताब्यात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोपींना चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून ताब्यात

चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनींच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले.

अत्यंत निर्घृण पद्धतीने हिरेकुडी येथील जैन मुनींची हत्या करण्यात आल्याने कर्नाटक सह अनेक ठिकाणी मुनींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जात आहे.कर्नाटक सरकार सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील हिंदुत्ववादी संघटना आरोप करत आहेत.त्यामुळे पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

चिकोडी पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपीच्या कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पंधरा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.पण न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.चिकोडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले त्यावेळी हिंडलगा कारागृहाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कडेकोट बंदोबस्तात या आरोपींना जिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.नंतर त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24