शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तसेच क्रीडा भरती बेळगाव तर्फे घेतल्या जाणाऱ्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्र्यांच्या जलतरण स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक श्री नितीन जाधव तसेच सायकलिंग प्रशिक्षक श्री एम पी मरणुर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार आबा क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलभते सौ शुभांगी मंगळूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता प्रतिमेचे पूजन करून झाले.
यावेळी बेळगावातील अनेक मान्यवर नागरिक जलतरणपटू पालक व निमंत्रित उपस्थित होते. स्पर्धांना सकाळी ठीक साडेदहा वाजता सुरुवात झाली या स्पर्धेत जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक विक्रम प्रस्थापित केले. या स्पर्धेला उपस्थित मान्यवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्रीकृष्णानंद कामत श्री लक्ष्मण पवार श्री अशोक शिंत्रे जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील उपाध्यक्ष श्री लक्ष्मण शिंदे, श्री विजय बनसुर मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर रघुनाथ बांडगी नेताजी जाधव माजी क्रिकेटपटू श्री महादेव कंगराळकर अजय भाटिया यांनी सर्व जलतरणपटूंना शुभेच्छा व्यक्त दिल्या.