This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मानले आभार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:या महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असल्यामुळे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी आज शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि शहापूर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी निमंत्रित करून सहकार्याबद्दल आभार प्रकट केले.

बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे येत्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या शहरातील विविध संस्था -संघटनांना धन्यवाद देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी आज शनिवारी सकाळी दोन्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी चहापाण्यासाठी निमंत्रित केले होते.

त्यावेळी आपली पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एस.एन.सिद्धरामप्पा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले.

सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे सचिव राजू सुतार यांनी देखील महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त एस.एन.सिद्धारामप्पा व त्यांच्या सौभाग्यवती यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी, रमेश कळसनवर यांची समयोचित सन्मानार्थ विचार मांडले.

याप्रसंगी महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सरचिटणीस महादेव पाटील, पदाधिकारी शिवराज पाटील,रमेश कळसन्नावर, धनंजय पाटील,अजित कोकणे,शंकर बाबली महाराज, राजेंद्र हंडे अंकुश केसरकर,मदन बामणे, सुधाकर चाळके, किरण हुद्दार, उदय पाटील, विशाल कंग्राळकर,आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने विकास कलघटगी यांनी विशेष प्रयत्न केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now