कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना राज्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी डॉ. आंबेडकर क्रांती युवा वेदीके बेळगाव या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये गेल्या 22 जानेवारी रोजी रात्री कांही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे.
तेंव्हा त्या समाजकंटकांवर कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच त्यांना राज्यातून हद्दपार करण्यात यावे. कलबुर्गी जिल्ह्यातील निंद्य घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी, अशी मागणी करण्यात आलीय