स्त्री व्यक्तीत्व शिक्षणामुळेच उंचावते- सुरेखा कामुले
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एच.जे.मोळेराखी यांच्या सानिध्यात मराठा मंडळ स्थापना दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथपाल सुरेखा कामुले या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वृषाली कदम यांनी प्रस्तावना मांडून सर्वांचे स्वागत केले.पुष्पार्पणा नंतर सुरेखा कामुले म्हणाल्या की मराठा मंडळाची स्थापना ग्रामीण आणि मुली शिक्षणा करिताच करण्यात आली.नाथाजीरावांनी स्त्री शिक्षणासाठी लावलेले रोपटे आज एक विशाल वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे.विद्यमान अध्यक्षा डाॅ.राजश्री नागराजू यांच्यामुळे आज हा वटवृक्ष राज्य आणि देशामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचला आहे. स्त्रीचे व्यक्तीत्व शिक्षणामुळेच आज समाजात उंचावत आहे. शिक्षित स्त्री आज प्रत्येक कार्य क्षेत्रात आपले योगदान देत आहे . शब्द सुमनाने सुरेखा कामुले यांनी मराठा मंडळ चा इतिहास विद्यार्थ्यांच्या समोर मांडला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एच.जे.मोळेराखी म्हणाले मराठा मंडळ ही संस्था आज शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी मारत आहे.येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देशात आणि विदेशात अनेक उच्च पदावर विराजमान आहेत हे आज आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद गोष्ट आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डाॅ. आरती जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया अनगोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
D Media 24 > Education > *स्त्री व्यक्तीत्व शिक्षणामुळेच उंचावते- सुरेखा कामुले*
*स्त्री व्यक्तीत्व शिक्षणामुळेच उंचावते- सुरेखा कामुले*
Deepak Sutar03/01/2024
posted on
Leave a reply