विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचयाना गावात घराजवळ खेळत असलेला सात्विक हा २ वर्षाचा बालक काल संध्याकाळी चुकून कूपनलिकामध्ये पडला.
यावेळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम संध्याकाळपासून मुलाला वाचवण्यासाठी सतत कार्यरत करत होती.येथील कूपनलिका शेजारी आडवा बोगदा खोदून कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला.
दुसरीकडे, बचाव कर्मचाऱ्यांनी बालक सात्विकला पाईपमधून खोदलेल्या बोगद्यातून बाहेर काढले. सलग 19 तास मुलाने ट्यूबवेलमध्ये जीवन-मरणाचा संघर्ष केला आणि मृत्यू वर त्याने मात केली अखेर मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मुलाला बाहेर काढल्यावर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.