बेळगाव: राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे गोमांस तू करणाऱ्या वाहनाला श्री राम सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच गोरक्षकांनी मध्यरात्री अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
काल रात्री श्री राम सेना, बजरंग दल आणि हिंदुराष्ट्र संघटनांनी मिरजहून हैदराबादकडे गोमांस वाहतून करणाऱ्या वाहनाला हिरेबागेवाडीजवळ मध्यरात्री 2 वाजता अडवून बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, बेळगावमार्गे हैदराबादला गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग करून हिरेबागेवाडीजवळ गोमांस वाहतूक करणारे वाहन अडवले व चालकासह वाहन ताब्यात घेतले. बागेवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.वाहनातून 12 टन गोमांस जप्त करण्यात आले.वाहन मालक हा मिरजेचा असल्याचे समजले आहे.परराज्यातून होणाऱ्या गोमांसाच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत गोमांसाच्या वाहतुकीवर आळा घालावा असा संताप श्री राम सेना, हिंदुराष्ट्र सेना, बजरंग दलच्या कार्यकर्ते व्यक्त केला.