This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*विद्यार्थ्यांची गणिताच्या पेपरला दांडी*

*विद्यार्थ्यांची गणिताच्या पेपरला दांडी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव  : दहावीचा आज गणित विषयाचा पेपर पार पडला. या पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ३५२ तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात ६५३ विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. शहरातील अंजुमन शाळेतील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीची तब्येत बिघडल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिच्यावर उपचार करून घेतले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने पेपर दिला आहे.

कॉपीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी भरारी पथकासह गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पंचायत कार्यालयातून सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले जात आहे. शहरातील एका परीक्षा केंद्रावर पंधरा ते वीस मिनिटे विद्यार्थ्यांना थांबवून ठेवण्यात आले.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यास कमी वेळ मिळाल्याची तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. अंजुमन शाळेतील केंद्रावर पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीची तब्येत बिघडली. याची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व सीआरपी आय. जी. हिरेमठ यांनी तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधून विद्यार्थिनीवर प्राथमिक उपचार करून घेतले. सकाळी उपाशीपोटी आल्यामुळे आणि परीक्षेच्या दडपणामुळे विद्यार्थिनीला त्रास झाला; मात्र, तातडीने उपचार मिळाल्यामुळे विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तसेच, तिने पेपरही दिला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. दहावीच्या परीक्षेची सांगता ६ एप्रिल रोजी होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24