बेळगाव : काँग्रेस पक्ष तळागाळापासून मजबूत करूया. बहीण प्रियंका जारकीहोळीला सक्षम बनवूया. चला पक्ष आणि बहिणीला सत्तेत आणण्यासाठी कठोर परिश्रम करूया, असे युवा नेते राहुल जारकीहोळी म्हणाले. यमकनमराडी मतदारसंघाच्या हुदली, काकती, कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीतील काँग्रेस पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले.
देशात स्वच्छ कारभार देणारी काँग्रेस, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस. तेव्हा जिल्ह्यासह देशाच्या विकासाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या विजयावर पैज लावू आणि लोकसभेवर पाठवू. बहीण प्रियांकाला बहुमताने विजयी करायला व्हावे. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी जातीभेद न करता समाज संघटित करून पक्ष संघटित केला पाहिजे. मतदारांना विश्वासात घ्या, असे ते म्हणाले.
वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मतदारसंघाचा विकास, शिक्षण आणि संपूर्ण समाजाच्या समृद्धीसाठी योगदान दिले आहे.मतदारांनी वडिलांना जसा आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवला आहे.तसाच आपल्या बहिणीला आशीर्वाद द्यावा, असे ते म्हणाले.
वडील सतीश जारकीहोळी यमकनमर्डी मतदार संघातून मोठ्या मतांच्या फरकाने विजयी मिळुन जिल्हा पालक मंत्री म्हणून त्यांनी राज्यात विकास कामांना सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या यांनी सरकारी हमी योजना लागू केल्या आहेत.या योजना घरोघरी पोहोचवण्यात सुध्दा आली आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, यासाठी युवा नेत्या प्रियांका जारकीहोळी चिक्कोडीतून मतदार संघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले असून, त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
याप्रसंगी युवा नेत्या प्रियंका जारकीहोलीळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. सुसज्ज रस्ता, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करून कार्य केले आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने यमकनमर्डी क्षेत्रात काम करण्यासाठी दिग्गज कंपन्यांनी भरपूर सहकार्य केले आहे. त्यातून हजारो तरुणांचा उदरनिर्वाह केला आहे. मी जर खासदार झाल्यास मतदारसंघाचा विकास आणखी सुकर होईल.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे तर मतदारांनी मला आशीर्वाद द्यावा, असे मत युवा नेत्या प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. बहुमताने जिंकण्यासाठी तुम्ही सर्वांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी असले पाहिजे. देशासाठी मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेसची भूतकाळाची आठवण ठेवून मतदान करावे, असे ते म्हणाले.
यावेळी केपीसीसी सदस्य मलागौडा पाटील, सिद्दकी अंकलगी, सिद्धू सुनागारा, जयश्री मलागी,बाबू शुतारा, दीपा पाटील यांच्या सहीत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.