This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

सीडी प्रकरणाचा  सूत्रधार डीके शिवकुमार: रमेश जारकीहोळी यांचे वक्तव्य 

सीडी प्रकरणाचा  सूत्रधार डीके शिवकुमार: रमेश जारकीहोळी यांचे वक्तव्य 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीडी प्रकरणाचा  सूत्रधार डीके शिवकुमार: रमेश जारकीहोळी यांचे वक्तव्य

 

सीडी प्रकरणातील ती युवती बेंगळूरातील एका काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या घरात असल्याचा दावा रमेश जारकीहोळी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 

 

यावेळी ते पुढे म्हणाले की राज्यातील अनेक बडे राजकारणी आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. माझ्या विरोधात रचण्यात आलेल्या त्या सीडी प्रकरणातील युवती ही बेंगळूरातील एका काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या घरात आहे .गेल्या दीड वर्षांपासून माझ्या विरोधात सातत्याने षडयंत्र केले जात आहे. कथित सीडी प्रकरणाव्दारे माझे वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्वा मागे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हेच कारणीभूत आहेत असा आरोप त्यांनी केली .

 

 

तसेच या प्रकरणी त्यांनी यावेळी घेतली आणि त्या सर्वाना अटक करण्याची मागणी केली .या संदर्भात आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी करत आहोत. असे देखील सांगितले .

 

 

पुढे बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, डी. के. शिवकुमार यांच्याशी माझे घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध होते. मात्र बेंगळुर येथील एका जागे प्रकरणानंतर आमच्या मतभेद निर्माण झाले. ते मतभेद आता टोकाला गेले आहेत. त्यामुळे ते सूड उगवत आहेत

 

 

डी. के. शिवकुमार यांनी मोठा काळा पैसा जमवीला आहे. डी. के. शिवकुमार यांनी माझे राजकीय आणि वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील बडे राजकारणी तसेच अधिकाऱ्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात आहे.हे त्यांचे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला

 

त्यानंतर त्यांनी ग्रामीण आमदारांच्या साखर कारखान्याची चौकशी केली जावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

 

 

आणि या चौकशी अंती डी. के. शिवकुमार यांना निश्चितच अटक होईल. असा विश्वास व्यक्त केला आणि याप्रकरणी त्या दोघांना तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24