*श्री वरसिद्धिविनायक मंदिर*
*12 व्या वर्धापदिनानिमित्त गणहोम,_महाप्रसाद_*
#रामनगर कंग्राळी खुर्द येथील श्री वरसिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापदिनदिना निमित्त येत्या रविवार दी.16-4-2023 रोजी गणहोम आणि महाप्रसाद आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*रामनगर कंग्राळी खुर्द येथे श्री वरसिध्दीविनायक मंदिर* येथे रवीवारी सकाळी 7:00 वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात प्रातःस्मरणाने होणार असून त्यानंतर *श्री गणेश वंदन, अभिषेक संकल्प, पुण्याहवाचन, आचार्यकर्म, ब्रह्मादिमंडल देवतास्थापन पूजन, अग्नीस्थापना, नवग्रहदेवता स्थापना पूजन,नवग्रह हवन,गणहोम,पूर्णाहुती,आशीर्वचन, हे विधी होणार आहेत. तसेच श्रींची पंचोपचार पूजा, नैवेद्य,महाआरती,मंत्रपुष्पांजली* प्रार्थना व *महाप्रसाद* वितरण दुपारी ठीक 12:30 वाजता होणार आहे. त्यानंतर गावातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 8 वाजता श्रीं ची पंचोपचार पूजा आरती, मंत्रपुष्प प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होईल.
येत्या रविवार दि. 16 एप्रिल 2023 रोजी मंदिर वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त भाविकांनी गणहोम आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
*श्री वरसिद्धिविनायक मंदिर कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी, व सभासद यांनी केले आहे*.
🙏 *अन्न दान श्रेष्ठ महादान*🙏
_#सुचाना- *ज्या गणेश भक्तांना महाप्रसाद साठी साहित्य अथवा देणगी द्यावयाची असेल तर मंदिर कमिटी सी संपर्क साधावा*._
*सहकार्य-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द, ग्रामपंचायत कंग्राळी खुर्द, गावडे कमिटी,गावातील सर्व गणेश उत्सव मंडळे,महिला मंडळे.भजनी मंडळे, व सामाजिक कार्यरत संघ*