This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे महिला दिन उत्साहात साजरा.*

*श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे महिला दिन उत्साहात साजरा.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळ कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव यांच्यावतीने जागतिक महिला दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन लेडी कमल शानबाग, प्रीती पाटील, डॉक्टर उज्वला हलगेकर, मार्केट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रिटा लाड आणि कपिलेश्वर वेल्फर सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत शानबाग उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रथम श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळाची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच नवीन सभासदांना समावून घेऊन महिला मंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी कांचन मुतगेकर यांची एकमताने निवड करण्यात आली .नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष -कांचन मुतगेकर, उपाध्यक्ष -साक्षी देसुरकर, सेक्रेटरी -अंजना कोथिंबिरीकर, उपसेक्रेटरी -जान्हवी काकतीकर, खजिनदार -वैशाली पाटील, उपखजिनदार -श्वेता घाडगे.

नूतन अध्यक्षा कांचन मुतगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारिणीच्या निवडीनंतर महिला दिनाचे औचित्य साधून कॉलनीतील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी समायोचित विचार व्यक्त केले. अनुजा देसूरकर आणि अंजना कोथिंबिरीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महिला दिनानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी केले. शेवटी श्वेता घाटगे यांनी सर्वांचे आभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24