बेळगावात चांदीमध्ये आयोद्धेतील श्री राम मंदिर साकारण्यात आले आहे .पोतदार बंधू यांनी आपल्या कारागिरकडून सुंदर अशी हुबेहूब दिसणारे श्री राम मंदिरची चांदी मध्ये प्रतिकृती साकारली आहे.
440 ग्रॅम चांदीचा उपयोग या मंदिर बनविण्याकरिता लागलेला आहे याची जवळपास किंमत 50 हजार रुपये इतकी आहे.राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही .
त्यामुळे या दिवशी रामभक्त आवर्जून श्रीराम प्रभू यांच्याशी संबंधित काहीतरी गोष्ट खरीदी करणार हा विचार करून हे मंदिर साकारण्यात आले आहे . विशेष म्हणजे या छोट्या मंदिरात श्रीराम आणि सीतामाता यांच्या छोट्या मुर्त्या देखील आहेत.
त्याचबरोबर श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमंतराय असलेली चांदीची नाणी सुद्धा तयार करण्यात आली आहेत. चांदीचे राम मंदिर पाहण्याकरिता नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा गर्दी करत आहेत