बेळगाव जिल्ह्यातील केरुर येथील श्री अरण्य सिद्धेश्वर यात्रा भंडाऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेत गादी आणणे,करी बांधणे,महाप्रसाद,बैलगाडी शर्यत ,धावण्याची शर्यत आणि भाकणुक असे विविध कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत पार पडले.आज शेवटच्या दिवशी लाखो भक्तांच्या उपस्थित भंडाऱ्याच्या उधळणीत यात्रेची सांगता झाली. निवळकी , भाकणूक व अभिषेकाच्या कार्यक्रमाला कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून लाखो भाविक उपस्थित होते.
लाखो भक्तांनी देवावर भंडाऱ्याची उधळण केल्यामुळे केवळ मंदिर परिसर नव्हे तर केरूर गाव भंडाऱ्यात न्हाऊन निघाले होते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.