बेळगांव:हिंदु हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चिकित्सा व नेत्रस तपासणी शिबिराचे आयोजन आज. कंग्राळी बुद्रुक येथील विठ्ठल मंदिराचे मोफत आरोग्य चिकित्सा ताप,सर्दी,डोकेदुखी,अंगदुखी,ॲसिडिटी,आणि नेत्र तपासणी चष्मा व औषध वाटप शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालय रामलिंग खिंड गल्ली बेळगाव आणि पंचमंडळी, युवक मंडळ,महिला मंडळ कंग्राळी बीके यांच्यावतीने करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात ,डॉ शरद चव्हाण ,डॉ रवी चव्हाण,डॉ पंकज चव्हाण, मयूर मोरे ,तसेच बेळगाव शिवसेना शाखेचे प्रवीण तेजम, वकील सुधीर चव्हाण,वाय बी चव्हाण, ओंकार सोसायटी चेअरमन गोपाळ पाटील,अनिता चव्हाण, ग्रा.प अध्यक्ष कैसर बंदेनावाज सैय्यद,ग्रा.प सदस्य भरता पाटील, जयराम पाटील,अर्चना चव्हाण सामाजिक कार्यकर्ता वैष्णवी मुळीक, मल्लाप्पा निलजकर, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या शिबिराचा लाभ गावातील असंख्य नागरिकांनी घेतला.