कंग्राळी खुर्द गावातील शिवमूर्तीच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे काम निधी नसल्याकारणाने मागील *चार वर्षापासून* रखडलेले होते ह्या कामासाठी *मोठ्या निधीची* अपेक्षा असल्याने आज सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या सहकार्याने या कामाला सुरुवात झाली. प्रत्येक वाॅर्डाच्या विकासासाठी जो निधी आला होता तो सर्व निधी *प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने* आपल्या *वाॅर्डासाठी न वापरता* *शिवमुर्तीच्या* मागील बाजूच्या नाल्यासाठी एक मताने मंजूर केला.
व या रखडलेल्या कामाला सुरुवात केली या नाल्याचे काम चालू असल्याकारणाने येथील *रस्ता ये-जा करण्यास बंद करण्यात आला आहे* तरी गावातील नागरिकांनी दुसऱ्या रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, भाऊ पाटील सदस्य प्रशांत पाटील ,राकेश पाटील ,वैजू बेन्नाळकर तसेच कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.