This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*विशेष स्काऊट गाईड मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्या आयोजन*

*विशेष स्काऊट गाईड मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्या आयोजन*
D Media 24

*कर्नाटकाचे माजी मंत्री पी.जी.आर. शिंदे करणार शिबिराचे  उद्घाटन बेळगाव : जिल्हा विभागीय नऊ जिल्ह्यांमधील प्राध्यापकांना विशेष स्काऊट गाईड मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्या आयोजन : जॉईन डायरेक्टर गजानन मन्नीकेरी करणार विशेष मार्गदर्शन: 450 प्राध्यापक होणार सहभागी*

————————-

बेळगाव, तारीख 13जुलै 2023 : सेंट अँटोनी इंग्लिश मीडियम हायस्कूल फिश मार्केट जवळ कॅम्प बेळगाव या ठिकाणी शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 आणि शनिवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी दोन दिवशी या स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर वर्कशॉप बेसिक तसेच विविध संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्ये 450 ( साडेचारशे ) पेक्षा अधिक प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

प्रमुख उद्घाटक म्हणून बेळगाव विभागीय नऊ जिल्ह्यामधील शिक्षक आणि पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच पदवी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विशेष स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर बेसिक वर्कशॉप प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर चे तालुका, जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष असे प्रशिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रयत्न मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी हे भारत देशाचे सक्षम सुदृढ अशी संपत्ती आहे. त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची उत्तम बुद्ध माहिती दिल्यानंतर सर्वांगीण विकास साधण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. भारताच्या सक्षमीकरणासाठी स्काऊट गाईड आणि रोवर रेंज यांच्या प्रशिक्षणाची जरुरी महत्त्वाची असते ती योग्य वेळेला विद्यार्थी पालक शिक्षक यांना प्रशिक्षण दिल्याने विकास साधायला पूरक वातावरण ठरेल. भारत देश आणि राजांचा विकास साधण्याकरिता बाल वयातच मूल्य शिक्षण व्यायामाचे महत्त्व शिक्षणाचे महत्त्व समाजकारण अर्थकारण राजकारण संशोधन अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास योग्य वेळेला विद्यार्थ्यांची पोचवला गेला तर सुदृढ समाज निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक ठरेल असा उद्देश या प्रशिक्षणातून दिला जाणार आहे.

कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि राज्य मुख्य आयुक्त भारत स्काऊट अँड गाईड बेंगलोर चे मुख्य प्रतिनिधी आणि समाजसेवक श्री पी. जी. आर. शिंदे या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक उपस्थित राहणार आहेत; यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग जॉईन डायरेक्टर धारवाड आणि भारत स्काऊट गाईडचे चीफ कमिशनर बेळगाव जिल्ह्याचे श्री गजानन मंन्नीकेरी प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

तसेच बेळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या मार्गदर्शिका आणि पदाधिकारी श्रीमती प्रभावती पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
तरी भारत स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर संस्थेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने नऊ जिल्ह्यातील सर्व पदवी पूर्व महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालय येथील प्राध्यापकांनी उपस्थित राहून ज्ञानात भर घालावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

*विशेष वेगळ्या ठिकाणी आयुक्तांच्या भेटी*

शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी व शनिवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी दोन दिवसीय बेळगाव जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या भेटीसाठी

कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि राज्य मुख्य आयुक्त भारत स्काऊट अँड गाईड बेंगलोर चे मुख्य प्रतिनिधी आणि समाजसेवक श्री पी. जी. आर. शिंदे, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग जॉईन डायरेक्टर धारवाड आणि भारत स्काऊट गाईडचे चीफ कमिशनर बेळगाव जिल्ह्याचे श्री गजानन मंन्नीकेरी, तसेच बेळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या मार्गदर्शिका आणि पदाधिकारी श्रीमती प्रभावती पाटील विविध ठिकाणी जिल्ह्यामध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव आणि बेळगाव परिसर, सौंदत्ती , बैलहोंगल, चिकोडी या ठिकाणी विशेष भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती भारत स्काऊट गाईड बेंगलोर कर्नाटक राष्ट्रीय सचिव के. गंगाप्पागौडा यांनी माहिती दिलेली आहे.

————

__________________


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • Howdy! Do you know if they make any plugins to assist
    with SEO? I’m trying to get my website to rank for some targeted
    keywords but I’m not seeing very good gains. If you know
    of any please share. Kudos! I saw similar text here: Eco product

  • Hey! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying
    to get my site to rank for some targeted keywords but I’m not seeing
    very good results. If you know of any please share. Kudos!

    I saw similar blog here: Change your life

Leave a Reply