सीपीईडी ग्राउंड रोडजवळ एका व्यक्तीला सामाजिक कार्यकर्तांनी मदत केली आहे.
रुग्णालयातून पळून गेलेल्या पायात कृमी झालेल्या आणि मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला सिव्हिल जिल्हा रुग्णालयात आधीच उपचार घेत असताना पकडण्यात आले.आणि परत दाखल
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका सेवांना त्वरित संपर्क केला .दोघांनी मिळून त्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या विशेष काळजीसाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले . यावेळी त्याची प्रकृती गंभीर आहे हे ओळखून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्या व्यक्तीचा पाय वाचवण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत , आतिश धातोंबे आणि साईराम जहागीरदार यांनी याकामी मदत केली .