खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये गेला काही महिन्यांपासून राहत असलेली एक वृद्ध अशोक बिडीकर वय 60 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले या वृद्धांवर समाजसेविका माधुरी जाधव यांनी अंत्यसंस्कार केले.
मृत झालेल्या वृत्तावर रुग्णालयात उपचार सुरू होते यावेळी सदर माहिती निराधार केंद्रातील रावसाहेब शिरहट्टी यांनी माधुरी जाधव यांना दिले त्यानंतर माधुरी जाधव यांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमी मध्ये अशोक बिडीकर या वृद्धावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी स्मशानभूमी मधील सर्व अंत्यसंस्काराची व्यवस्था करून त्यांनी सदर वृद्धावर अंत्यसंस्कार करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.