*स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर* *यांचा सत्कार* .
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन ला कर्नाटका राज्याचा 2023- 24 पुरस्कार मिळाला. असोसिएशनचे प्रशिक्षक श्री. सूर्यकांत हिंडलगेकर यानी स्केटिंग या खेलाप्रती समर्पण दिलयामुळे हा पुरस्कार मिळाला संघटनेला प्रतिष्ठित राज्य पुरस्कार मिळवून देण्यात त्यानी मोलाची भूमिका बजावली आहे.
या साठी गोवावेस स्केटिंग रिंक वर त्यांचा अभिनंदन आणि सन्मान करण्यात आला हा सन्मान माजी आमदार अरविंद पाटील खानापूर यांच्या हस्ते झाला, यावेळी श्री अशोक गोरे श्री संतोष श्रीगारी, श्री आनंद वाज, श्री मायकल कार्दोस व गोवावेस स्केटिंग चे स्केटरर्स आणि पालक उपस्थित होते.