खानापूर रोड टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती कमल कुलकर्णी यांच्या गेल्या 25 वर्षापासून चालत आलेल्या स्तोत्रपठण वर्गाचा रौप्यमहोत्सव, त्यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला .अध्यक्षस्थानी गुरुमाता प. पू. स्वात्मनिष्ठानंदा सरस्वती माताजी होत्या, प्रथम माताजींच्या हस्ते आद्यगुरू श्रीमद शंकरावार्य यांच्या प्रतिमेचे व श्रीमद्भगवद्गीतेचे पूजन झाले, त्यानंतर सुप्रिया कुलकर्णी व सुनंदा कुलकर्णी यांनी मानाजींचे पाद्यपूजन केले, याचवेळी श्रीहरि ज्योतिषालयातर्फे ज्योतिषम्वार्य पं. तेजराज किंकर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी माताजींचा सत्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतला .
यानंतर माताजींनी स्तोत्रपठण व मानसपूजा यांचे महत्व विशद करून सांगितले त्यानंतर भारती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर तबला व पेठीच्या साथीन स्तोत्रपठण झाले, श्रीदत्तगुरु व श्रीराम यांच्या स्तुतीस्तवनाने कार्यक्रमाती सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमल कुलकर्णी यांनी केले .
यावेळी त्यांनी सूत्रसंचलनात आपल्या 25 वर्षीय कार्याचा आढावा घेतला .25 वर्षान आदर्श नगर व बेळगांवातही त्यांनी हा वर्ग सुरु केला होता. तो अजूनही सुखद देशपांडे व माया कुलकर्णी या चालवितात. या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने या बोलींनी माया कुलकर्णी यांचा व टिळकवाडी येथील वर्गाच्या पहिल्या व्यक्ति बॅचच्या प्रतिनिधी म्हणून मीरा कुलकर्णी यांचा माताजीच्या हस्ते सन्मान करण्यात आला .त्यानंतर अल्पोपहाराने या संपूर्ण कार्यक्रर्माची सांगता झाली.