बेळगाव शहरात वारंवार जंगली प्राण्यांचे दर्शन होत आहे. गेल्या आठवड्यात हत्तीने शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातला होता तर आत्ता हिंडाल्को परिसरामध्ये 18 मार्च रोजी रात्री दहा वाजता पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे.
त्यामुळे हिंडाल्को परिसरात असलेल्या कारखानदारांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि या ठिकाणी त्यांना पायाचे ठसे पाहिल्यानंतर ती वाघीण असल्याचे आढळून आले आहे.
हिंडाल्को परिसरात असलेल्या कारखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये वाघिणीची छबी कैद झाली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.