This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सिध्दांत वर्मा यांची कर्नाटक संघात निवड.*

*सिध्दांत वर्मा यांची कर्नाटक संघात निवड.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिध्दांत वर्मा यांची कर्नाटक संघात निवड.

बेळगांव ता,02. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा हँडबॉल खेळाडू सिद्धांत शैलेंद्र वर्मा याची 67 व्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे.
नुकत्याच दावणगिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्या संघाने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते.

बेळगांवचे प्रतिनिधित्व करताना सिद्धांत वर्मा यांने संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला.पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने गुलबर्गाचा 18 -15 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बेळगांवने म्हैसूरचा 17 –13 असा पराभव केला, तर अखेरच्या साखळी सामन्यात बेंगलोरने बेळगावचा 14-13असा अटीतटीच्या लढतीत पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धत सिध्दांतने अंतिम लढतीत सर्वोत्कृष्ट गोलरक्षण करित उकूष्ट कामगिरी करीत कडवी झुंज देण्यात यश मिळवले आता आगामी सुजयपूर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 67 व्या शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्य हँडबॉल संघात निवड झाली आहे त्याला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील ,क्रीडा शिक्षक, चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट, यांचे मार्गदर्शन,तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार , उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव ,प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24