This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्री बिरदेव यात्रेची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने सांगता*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बिरोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत खारीक, खोबरे, भंडाराच्या उधळणीत कोगनोळी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने सांगता झाली.

शनिवारी मानाचे तोरण बांधून यात्रेची सुरुवात करण्यात आली होती .यात्रे निमित्त रोज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम रात्री ढोल वादन (वालंग), पालखी मंदिर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.ढोल वादन (वालंग), पालखी प्रदक्षिणा, हेडाम खेळवणे, पहाटे भुदरगड तालुका राधानगरी येथील कृष्णात ढोणे महाराज यांची भाकणूक झाली.यात्रेनिमित्त

विविध शर्यती संपन्न झाल्या. यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी गर्दी केली होती. यात्रेची सांगता पालखी सोहळ्याने झाली.

पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून गावातील बिरदेव मंदिरात सवाद्य मिरवणुकीने आल्या. यावेळी खारीक, खोबरे, भंडार्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या बिरदेव यात्रेची सांगता केली. अनेक भाविकांनी दंडवत घातले. अनेक भाविकांनी उत्सवाचे नवरात्र यावेळी सोडले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now