जिल्हा प्रशासन,जिल्हा पंचायत,कन्नड आणि संस्कृती खाते आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली.कर्नाटकच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंत्रघोषात छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आमदार चन्नराज हट्टीहोळी,महापौर सविता कांबळे आणि उप महापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.