एक्वेरियस क्लब आणि स्विमर क्लबची जलतरणपटू शरण्या कुंभार हिने राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत यश संपादन केले आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
नुकत्याच पुरंदर गुजरात येथे पार पडलेल्या स्वीमेथोन 2024 या राष्ट्रीय पातळीवरील सागरी जलतरण स्पर्धेमध्ये कर्नाटकाचे प्रतिनिधित्व शरण्या कुंभारी ने केले होते.
शरण्य ही दिव्यांग विभागात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत बेळगाव बरोबरच कर्नाटकाचे नाव उंचावले आहे . शरण्या हिने दिव्यांगांसाठीचा एक किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले तर पाच किलोमीटर अंतराच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळविले.
शरण्या ही मार्कंडेय नगर येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्त्या संतोषकला शशिकांत कुंभार यांची कन्या आहे ती जे एन एम सी जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेते. तिला प्रशिक्षक उमेश कलगट घे अक्षय शेरेगार अजिंक्य मेंडके नितीन कडूचकर यांच्यासह अनेकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभते आहे.