बैलहोंगल येथे जुगार अड्ड्यावर बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून सत्तर जुगाऱ्याना अटक केली.रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आले.
बैलहोंगल येथे मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.त्याच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून सत्तर जुगाऱ्याना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि सत्तर मोबाईल जप्त केले.अटक करण्यात आलेल्या सत्तर जुगाऱ्याना पोलिसांच्या दोन बसमधून बेळगावातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले.रात्री उशिरा पर्यंत कर्नाटक पोलीस कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घातलेल्या धाडीची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती.