नियोजित वराचा खून केल्याच्या आरोपातून सात जण निर्दोष
बेळगावनियोजित वधू व तिच्या प्रियकराने वराचा खून केल्याचा आरोप करत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांची तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश चन्नाप्पा गौडा यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
हणमंत रामाप्पा मरलिंगप्पण्णावर (वय २८), बसव्वा ऊर्फ बसम्मा परमेश्वर तळवार (वय २५), उमेश सन्नगदीगेप्पा बारिगीडद (वय २३, सर्व रा. बिसीडोणी, ता. सौंदत्ती), इरफान ऊर्फ मेहबूबसाब खाजेसाब कागदगार (वय ३०, रा. गंडीमड्डी, ता. गदग), महम्मदसलीम ऊर्फ सलीम मक्तुमसाब बागलकोट (वय २२), सादिक मक्तुमसाब कागदगार (वय २९, दोघेही रा. गदग), हरिष मल्लिकार्जुन देवगण्णावर (वय २२, रा. कौजगेरी, ता. रोण, जि. गदग) अशी निर्दोष मुक्तता
झालेल्यांची नावे आहेत. सौंदत्ती तालुक्यातील गाजलेल्या या खून
– प्रकरणाबात अधिक माहिती अशी, संशयित आरोपी बसम्मा हिचा विवाह मयत मंजप्पा। गुळाप्पा वालीकर (वय ३०, रा. तिम्मापूर, ता. धारवाड) याच्याशी ठरला होता. या दोघांचा विवाह २० नोव्हेंबर २०१३ रोजी होणार होता. मंजप्पा हा लग्न पत्रिका घेऊन बसम्मा हिच्या घरी देण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी आला होता, मात्र संशयित आरोपी बसम्मा हिचे प्रेम मुख्य संशयित हणमंत मरलिंगप्पण्णावर याच्याशी होते.
याबाबत मुख्य आरोपीला पत्रिका देण्यासाठी आलेल्या मंजप्पाबद्दल संशयित हणमंत याला पत्रिका दिली. त्यानंतर काटा काढण्याचे ठरविले. त्यावरील सर्व संशयितांना त्याने बोलावून घेतले. त्यानंतर मंजप्पा हा घरातून जात असताना त्याला वाटेतच अडविले. त्याचे हातपाय बांधून अलमट्टी धरणात फेकून दिले होते. त्यानंतर मंजप्पा हा आपल्या घरी पोहोचला नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी सौंदत्ती
पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता मंजामा याचा मोबाईल एका संशयिताकडे आढळून आला. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली..
या प्रकरणी सौंदती पोलिसांनी वरील सर्वांवर भा.दं.वि. १४३, १४७, १२० (ब), ३६३, ३४१,०३०२, २०१ सहकलम १४९ अन्वये आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी येथील तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. मात्र साक्षीदारातील विसंगती आणि सबळ पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली
आहे. संशयितांच्यावतीने अॅड. बी. एस. घडेद, अॅड. एच. सी. सवसुद्दी, अॅड. आर. जी. पाटील, अॅड. एस. बी. दयण्णावर, अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.