नताशा चंदगडकर हिची क्षेत्रिय विद्याभारती स्पर्धेसाठी निवड.
बेळगाव ता,5. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची खेळाडू नताशा चंदगडकर हिची हैदराबाद येथे होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मंड्या येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत नताशा चंदगडकरने तिहेरी उडीत रौप्यपदक पटकाविले होते, तसेच लांब उडीत तिसरा क्रमांक पटकाविला होता, आता हैदराबाद येथे होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी तिची कर्नाटक संघात निवड झाली आहे, यासाठी ती गुरुवार ता 5 रोजी बेळगावमार्गे हैदराबादला रवाना झाली आहे, तिला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे व पालक वर्गाचे प्रोत्साहान लाभत आहे.