*शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, सन 2023 24 चे आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक वितरण, ग्रीन बोर्डचे उदघाट्न आणि इयत्ता आठवी वर्गाचा निरोप समारंभ* असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षातील विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच माजी विद्यार्थी संघांचे श्री दीपक किल्लेकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 2023-24 चा पुरस्कार देखील देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बबनराव हिंडलगेकर होते. यावेळी हिंडलगेकर सौ स्वाती हिंडलगेकर कडून शाळेला *ग्रीन बोर्ड आणि दूध पिण्याचे ग्लास* अशी देणगी देण्यात आली. या शाळेचे माजी विद्यार्थी अन्य उत्तम मुख्याध्यापक श्री राजू पालेकर सर यांनी आपल्या शाळेबद्दलच्या भावना व्यक्त करून आपण केव्हाही शाळेसाठी नेहमी येत जाऊ असं आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डी.एड प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी यांनी मनोगत मांडले. त्यानंतर दिगंबर पवार, हिंडलगेकर सर व मुख्याध्यापक मुचंडिकर सर यांनी शाळेच्या प्रगतीचा कार्याचा आढावा घेत पालकांच्या व माजी विद्यार्थी संघटना आणि SDMC यांच्या सकारात्मक वृत्तीबद्दल गौरवोदगार काढले. आजच्या कार्यक्रमास रविराज पाटील सर मराठा बॅंकेचे चेअरमन दिगंबर पवार सर, चव्हाट गल्ली क्लस्टर चे सीआरपी बेळगुंदकरसर, रवी नाईक, श्रीकांत कडोलकर, SDMC अध्यक्ष सौ तुपारे मॅडम तसेच व माजी विद्यार्थी व पालक वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती. सांस्कृतिक कार्यक्रमातले विद्यार्थ्यांच्या आतले सूप्त कलागुण पाहून उपस्थित आणि पालकांनी विद्यार्थ्यांची वाहवा केली.
प्रास्ताविक व्ही व्ही पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एच व्ही नाथबुवा व माळी सर तर आभार आर एन कांबळे यांनी मानले.