बेळगाव महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाकरिता निवडणूक झाली यावेळी 22व्या टर्म करिता महापौर अनुसूचित जाती आणि उपमहापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखी ठेवण्यात आले होते.
सत्ताधारी भाजपकडे 58 पैकी 35 सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे गेली. सतरा वॉर्ड क्रमांकच्या नगरसेविका सविता कांबळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली.
तर आनंद चव्हाण यांची उपमहापौर पदी निवड झाली आहे. महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने निकाल भाजप भाजपच्या बाजूने लागला.महापौर निवडणूक बिनविरोध झाली तर उपमहापौर पदा करिता आनंद चव्हाण यांना 59 मत्तांपैकी 39 मते पडली आणि ते विजयी झाले.