This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*सावंगाव इलेव्हन संघाला ग्रामीण प्रीमियर लीग चे विजेतेपद* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*सावंगाव इलेव्हन संघाला ग्रामीण प्रीमियर लीग चे विजेतेपद*

श्री ब्रम्हलिंग क्रिकेट क्लब बिजगर्णी,व मोहन मोरे पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदवला. साखळी प्रकारच्या या स्पर्धेमध्ये सावंगाव इलेव्हन संघाने सर्व सामने जिंकत अंतिम विजेतेपद पटकावले. बिजगर्णी येथील इंदिरानगर मैदाणात सल्लग दुसऱ्यांदा सावंगाव संघाने विजेतेपद पटकावले.

सावंगाव संघाने पहिला सामना हंगरगा संघाला पराभव करून जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात सावगाव विरुद्ध सुरुते या सामन्यामध्ये सावंगाव धावांनी जिंकला, तर तिसऱ्या सामन्यात शिवनगर संघाला पराभव केला. संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये नांदणीच्या नंतर तुडये संघाचा अतीतटीच्या सामना खेळत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना श्री ब्रम्हालिंग स्पोर्टस बिजगर्णी यांच्यात झाला. यामध्ये सावगाव संघाने तब्बल १९ धावांनी जिंकत ग्रामीण प्रीमियर लीग टी-२० चे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा भरविण्यासाठी बाळीराम अष्टेकर, राहुल जाधव, मारूती हलकर्णीकर, गजानन कोळी, शरद जाधव, भूषण जाधव, दर्शन अष्टेकर, राहुल कांबळे, जयंत जाधव, महेश तारिहाळकर, अजय मोरे, विकास बानेकर, सुमित अष्टेकर, जोतीबा गावडे यांनी योगदान दिले.

स्पर्धेमध्ये सामनावीर म्हणून रवींद्र याने गोलंदाज मध्ये ३ विकेट आणि फलंदाज मध्ये २७ धावा या खेळाडूचा गौरव करण्यात आला. या विजयाबद्दल पुरस्कर्ते मोहन मोरे व अमोल जाधव यांनी खेळाडूचे कौतुक केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now